Uday Samant : जे आरोप करताहेत ते स्वत: फडणवीस यांच्या संपर्कात; उदय सामतांचा गौप्यस्फोट

पुणेः शिवसेनेत सतत शिंदे सेना आणि उद्धव सेनेकडून अनेक दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. उद्धव सेनेचे संजय राऊत यांनी लवकरच शिंदे सेना फुटून उदय सामंत नवीन गट तयार करतील असा दावा केला होता. या दाव्याला उत्तर देताना पुढील काही दिवसांत ठाकरेंच्या सेनेतील आमदार, खासदार फुटतील असा प्रतिदावा मंत्री उदय सामंत यांनी केला. तसेच लवकरच ते पक्षसंघटनेत एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करून आमच्याकडे प्रवेश करतील असे म्हटले होते. ज्यांनी माझ्यावर आरोप केले तेच स्वःताह फडणवीस यांना फोन करीत असल्याचा गौप्यस्फोट सामतांनी केला आहे.
आता अॅापरेशन धनुष्यबाणासह अॅापरेशन टायगर देखील आम्ही राबवित आहोत, असे सामंत यांनी सांगितल्याने ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे तीन खासदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र, तांत्रिक कारणांमुळे त्यांचा प्रवेश थांबला आहे. अॅापरेशन धनुष्यबाणासह अॅापरेशन टायगर देखील आम्ही राबवत आहोत. या पहिल्या टप्प्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि माजी आमदार आमच्याकडे येतील. याची सुरूवात रत्नागिरी जिल्ह्यापासून होणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागातील अनेक माजी आमदार खासदार, जिल्हा प्रमुख पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करतील, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
ते स्वतः फडणवीस यांच्या संपर्कात
उद्योग मंत्री या नात्याने दावोसला असताना ज्या लोकांनी माझ्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. तसेच माझा राजकीय अस्त व्हावा यासाठी प्रयत्न केले. ते स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट सामंत यांनी केला आहे. वारंवर फडणवीस यांनी ते फोन करत आहेत. असे देखील ते म्हणाले.





