Chandrakant Patil | भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने पूर्णाकृती पुतळ्याला अनेक नेत्यांनी सोमवारी अभिवादन केले. राज्याचे तंत्र व उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील आंबेडकरांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मंत्री पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर मंत्री पाटील यांनी राज्याचे नेतृत्व करणारे तिघेही वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील आहेत. त्याच्यांत खडखड ही होणारच, असल्याचे विधान केले आहे. त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. खडखड होत आहे याचा अर्थ ते जिवंत आहेत अशा शब्दांत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाराजीचा चेंडू भिरकवला आहे.
नेमकं काय म्हणाले मंत्री चंदक्रांत पाटील?
१४ एप्रिल रोजी पुणे शहरात भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. आंंबेडकरांच्या पुतळ्याला अनेक नेत्यांनी अभिवादन केले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील आंबेडकरांच्या पूतळ्याला अभिवाद केले. यानंतर त्यांना माध्यांना बाईट दिली.
त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद आहेत का या प्रश्नावर पाटील यांनी दिलेले उत्तर नाराजीचा सूर आधोरिखेत करणारे होते. तसेच तिन्ही नेते सरकारमध्ये व्यवस्थित काम करत आहेत असे देखील पाटील म्हणाले.
खासदार संजय राऊतांना लगावला टोला
शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी शिवछत्रपतींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रायगडावर आलेल्या गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली होती. या टीकेला पाटील यांनी प्रत्युत्तर दिली आहे. शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर स्वत: ५०० पानांचे पुस्तक लिहिले आहे. त्याचे प्रकाशन दिल्लीत करायचे की महाराष्ट्रात यावर चर्चा सुरू आहे, ते प्रकाशन लवकरच होईल. राऊत यांनी ते वाचले तर त्यांना चक्कर येईल, असा टोला पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला






