अमित शाह यांच्या चारही नियोजित सभा रद्द; नागपूरहून अचानक दिल्लीला रवाना…

Amit Shah | विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या प्रचार सभांनी जोर धरला आहे. मात्र भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील सर्व सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ते तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहे. शाह आज विदर्भातील सर्व नियोजित सभांना संबोधित करणार होते.
अमित शाह यांच्या नियोजित असलेल्या चारही सभा रद्द करून ते तातडीने नागपुरातून दिल्लीसाठी निघाले आहे. अमित शहा गडचिरोली, वर्धा, काटोल आणि सावनेर येथे निवडणूक सभा घेणार होते. आजच्या चार सभांसाठी अमित शाहा काल संध्याकाळीच नागपुरात दाखल झाले होते. त्यांचा नागपूरातील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्काम होता.
अमित शाह दिल्लीकडे रवाना
तर आज (रविवारी) सकाळी 11 वाजताच्या सुमारास ते सभेसाठी गडचिरोलीला रवाना होणार होते. या सर्व सभा रद्द करून अमित शाह दिल्लीसाठी रवाना झाले आहे. मात्र या सर्व महत्वाच्या सभा रद्द करून अमित शाहांच्या दिल्लीवारी मागील कारण अद्याप सांगण्यात आलेले नाही. Amit Shah |
प्रियंका गांधीही आज नागपुरात
शाह यांच्या जागी आता स्मृती इराणी या ठिकाणी निवडणूक रॅली घेणार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी देखील आज नागपुरात दोन रोड-शो करणार आहेत. प्रियंका गांधी यांचा पहिला रोड-शो दुपारी अडीच वाजता अवस्थी नगर चौकातून दिनशॉ फॅक्टरी चौकपर्यंत पश्चिम नागपुरात काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी होईल. तर दुसरा रोड-शो मध्ये नागपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी गांधीगेट पासून बडकस चौकापर्यंत होणार आहे. Amit Shah |
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला काच टप्प्यात 288 जागांवर मतदान होणार आहे. अशातच प्रचार सभेसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना आज शाह जोमाने प्रचार करणार होते पण अचानक त्यांच्या सर्व सभा रद्द करण्यात आल्या आहेत. Amit Shah |
हेही वाचा:
‘मणिपुर ना एक है, ना सेफ है” ; मल्लिकार्जुन खर्गे यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा





