T20 World Cup Cricket | सरस कामगिरीनंतरही नरेनला डच्चू
Updated On:

जमैका – वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने आगामी आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. मात्र, यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सरस कामगिरी करुनही अष्टपैलु सुनील नरेन याला संघात स्थान देण्यात आलेले नाही.
संघाच्या कर्णधारपदी कॅरन पोलार्ड कायम असून नरेनबाबत मंडळाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मंडळाने त्याच्याबाबत पक्षपात केल्याचाही आरोप काही महिन्यांपूर्वी केला गेला होता.





