‘सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी….’; पंकजा मुंडेंनी टोचले सरकारचे कान, थेट म्हणाल्या….

Pankaja Mund | Laxman Hake | OBC : एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलेलं असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके. यांनी अंतरवली सराटीच्या वेशीवरील वडीगोद्री गावात आमरण उपोषण सुरू केलंय. गेल्या पाच दिवसांपासून ओबीसी नेत्यांचं उपोषण सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती खालावत चालली असून, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत या उपोषणाची दाखल घेतली आहे.
‘समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. हाके यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी सरकारकडे केले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, “लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे.
प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे…
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 17, 2024
पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पाहावे’. असं ट्विट त्यांनी केलं आहे.
हाच फुले, शाहू आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का?
मनोज जरांगे पाटील जेव्हा आंदोलन करतात तेव्हा त्यांना रेड कार्पेट टाकलं जातं. आम्ही उपोषण करतो तेव्हा शासनाकडून आमची साधी दखलही घेतली जात नाही. हाच फुले, शाहू आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
त्यांनी असेही म्हटले, ओबीसींची अनेक आंदोलने झाली. सावित्रीमाई फुलेंच्या जन्मगावीही आंदोलन केलं. त्यावेळी सरकारच्या स्थानिक प्रतिनिधीनेही या आंदोलनाची दखल घेतली नाही. चौंडी आणि भगवानगडाजवळही ओबीसींनी आंदोलन केलं.
त्याचीही सरकारने दखल घेतली नाही. हे सरकार ओबीसींचं नाही का? आमची लोकसंख्या 60 टक्के आहे. तरीही आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही. सरकार फक्त ठरावीक लोकांचं आणि वर्गाचं आहे काय?
लोकप्रतिनिधी असं करत असतील तर जायचं कुठे? म्हणून अंतरवली सराटीच्या वेशीवर वडीगोद्रीत आंदोलन सुरू केलं आहे. असं लक्ष्मण हाके म्हणाले. यावेळी ते समाज माध्यमांशी बोलत होते.





