All India Railway Kho-Kho C’ship 2024 : मध्य रेल्वे संघाला विजेतेपदाचा मुकुट…

All India Railway Kho-Kho C’ship 2024 :- मध्य रेल्वे संघाने पूर्वमध्य रेल्वे संघाला पराभूत करताना 18 व्या आखिल भारतीय आंतर रेल्वे खोखो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. बिलासपूर येथे झालेल्या स्पर्धेच्या अतितटीच्या झालेल्या अंतिम लढतीत मध्य रेल्वे संघाने 14-13 असा 1 गुणाने विजय साकारला.
मध्यंतराला दोन्ही संघ 7-7 असे बरोबरीत होते. अंतिम लढतीमध्ये रामजी कश्यप (२, १.१० मि. संरक्षण व ५ गुण), विजय हजारे (१.५०, २ मि. संरक्षण व १ गुण), संकेत कदम (१.३०, १.४० मि. संरक्षण), दिलीप खांडवी (१.३०, १.३० मि. संरक्षण व १ गुण) व अवधूत पाटील (नाबाद १.१० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी संघाला विजय मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली.
अरुण गुणकी (१.२०, १ मि. संरक्षण व २ गुण), निलेश (१.४० मि. संरक्षण व १ गुण), आदित्य गणपुले (१.१०, १.१० मि. संरक्षण) व स्वामी (१.१०, १.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी दिलेली लढत अपुरी राहिली. सर्वोत्तम खेळाडू म्हणून रामजी कश्यपला, सर्वोत्तम आक्रमणासाठी रंजन शेट्टी तर संरक्षणासाठी अरुण गुणकीला सन्मानित करण्यात आले.




