Alka Kerkar : मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि भाजपच्या विद्यमान नगरसेविका अलका केरकर (Alka Kerkar) यांचे अल्प आजाराने आज निधन झाले. त्यांनी लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अलका केरकर (Alka Kerkar) यांच्या निधनाने मुंबईच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळात गहिरा शोक पसरला आहे. त्या वार्ड क्रमांक ९८ (वांद्रे पश्चिम – खार पश्चिम परिसर) मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्काराची माहिती शनिवार, २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सांताक्रूझ पश्चिम येथील त्यांच्या राहत्या घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. रविवारी दुपारी १२ वाजता सांताक्रूझमधील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. कुटुंबीय, पक्ष कार्यकर्ते, स्थानिक रहिवासी आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अलका केरकर या भाजपच्या अत्यंत अनुभवी आणि लोकप्रिय नगरसेविका होत्या. त्या सलग तीन वेळा मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. २०१२ पासून त्या मुंबई महापालिकेत (BMC) सक्रिय होत्या आणि त्यांनी स्थानिक विकासकामांसाठी विशेष ओळख निर्माण केली होती. Alka Kerkar विशेषतः २०१४ ते २०१५ या काळात त्या मुंबई महापालिकेच्या उपमहापौर पदावर कार्यरत होत्या. या पदावर असताना त्यांनी शहराच्या प्रशासकीय कामकाजात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. उपमहापौर म्हणून त्यांना महापालिकेच्या विविध समित्या, धोरणे आणि विकास प्रकल्पांमध्ये सक्रिय सहभाग होता. अलका केरकर (Alka Kerkar) यांनी वांद्रे पश्चिम परिसरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि स्थानिक समस्या सोडवण्यासाठी अथक परिश्रम केले होते. त्यांच्या मेहनतीमुळे आणि जनसंपर्कामुळे त्या मतदारसंघात लोकप्रिय होत्या. २०२६ च्या महापालिका निवडणुकीतही त्या वार्ड ९८ मधून निवडून आल्या होत्या आणि महापौरपदाच्या शक्यतांमध्ये त्यांचे नाव चर्चेत होते. भाजप नेत्यांनी आणि मुंबईतील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अलका केरकर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.