Alia Bhatt : ‘रामायण’ चित्रपटासाठी आलियाची खास पोस्ट; पती रणबीरच केलं भरभरून कौतुक

Alia Bhatt : बॅालीवूड अभिनेता रणबीर कपूरच्या रामायण या बहुप्रतीक्षित चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर चित्रपटाची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. नितेश तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
या चित्रपटातील संपूर्ण कास्टची अधिकृत नावे या व्हिडीओच्या माध्यामातून समोर आली आहेत. रणबीर कपूर रामाची भूमिका साकारणार आहे, तर साई पल्लवी सीता आणि यश हा रावणाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. रामायणाच्या फर्स्ट लूक व्हिडीओचे सर्वत्र कौतुक होत असताना अभिनेत्री आलिया भटने पोस्ट लिहून रणबीरचे भरभरून कौतुक केले आहे.
काही गोष्टींना शब्दांची गरज नसते. ही एका अविस्मरणीय गोष्टीची सुरुवात आहे. त्याखाली अभिनेत्रीने दिवाळी २०२६ वाट पाहतेय, असे कॅप्शन तिने व्हिडीओच्या खाली दिले आहे. तसेच आलियाने चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०२६ रोजी दिवाळी प्रदर्शित होणार असून दुसरा भाग २०२७ मध्ये रिलीज करण्यात येणार असल्याचे रामायण चित्रपटाच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या पोस्टद्वारे अभिनेत्रीने पतीन रणबीरच्या चित्रपटाचे कौतुक करीत त्याला पाठिंबा दिला आहे.
View this post on Instagram
रामायण चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा अधिक केली जात होती. अशातच चित्रपटाचे पहिले पोस्टर त्यानंतर ३ मिनिटांचा व्हिडीओ रिलीज करून दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. या चित्रपटात हिंदी टेलिव्हिजनवरील अभिनेता रवी दुबे हा लक्ष्मणाच्या भूमिकेत आहे, तर अभिनेता बॅाबी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय चित्रपटात राजा दशरथ यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल हे साकारणार आहेत.





