आलियाने शेअर केली खास पोस्ट; चाहत्यांना दिल्या नवीन वर्षांच्या शुभेच्छा, फोटोने घेतले लक्ष वेधून

Alia Bhatt : नवीन वर्ष सुरू झाले असून, या वर्षांच्या निमित्ताने कलाविश्वातील कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. काही कलाकारांनी २०२५ हे वर्ष कसे गेले या संदर्भात पोस्ट केली होती. आता नवीन वर्षांच्या शुभेच्छा देणारी एक खास पोस्ट अभिनेत्री आलिया भटने केली आहे. या पोस्टमध्ये आलियाने एक फोटो देखील शेअर केला आहे.
आलिया ही नेहमीच तिच्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संपर्कात राहत असते. नुकतीच आलियाने तिच्या इंन्स्टाग्रामवर स्वतःचा, पती रणबीर कपूरचा आणि मुलगी रिया कपूरचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
आलियाने २०२६ चे स्वागत करण्यासाठी सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. हा फोटो समुद्रकिनाऱ्यावरील दिसत आहे. फोटोमध्ये रणबीर मुलगी रियाला हातात धरल्याचे आहे, तर आलिया त्याच्या मागे चालताना दिसत आहे. हा फोटो संध्यांकाळच्या वेळेत काढला असून, तिघांनीही पांढऱ्या रंगाचे ड्रेस परिधाना केले आहेत. आलियाच्या मुलीने वेअर केलेली पांढऱ्या रंगाची फ्रॅाक लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.
View this post on Instagram
या पोस्टसोबत आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘पुढे चालत राहो २०२६…’ असे म्हटले आहे. या पोस्टमधून तिने नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री आलिया भट तिच्या आगामी अनेक प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. या वर्षांत ती विविध चित्रपटांमधून दमदार भूमिकेत दिसणार असून, यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत
हेही वाचा : “दहशतवादी मसूद अजहरला भारतात आणा, ट्रम्प करू शकतात, तर…”; ओवैसींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन





