आलिया भट्टला वडिलांनी राहासाठी दिला मोठा सल्ला; म्हणाली ‘माझ्यासाठी…’

Aliya Bhatt Daughter| बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिली आहे. इतकेच काय तर तिची राहा कपूर हिच्या क्यूटनेसच्या चर्चा देखील सोशल मीडियावर होत असल्याचे पाहायला मिळाले. नुकतेच एका मुलाखतीत आलियाने राहाबद्दल सतावत असलेली चिंता व्यक्त केली आहे. तसेच राहाबाबत आलियाच्या वडीलांनी तिला दिलेल्या एका सल्ल्याबाबत देखील सांगितले आहे.
आलिया म्हणाली की, “अलीकडेच मला वडिलांनी राहासाठी महत्त्वाचा सल्ला दिला. जर तू राहाला ठेच लागू देणार नसेल, तर ती तुझी फार मोठी चूक असेल. कारण राहा पुढे आयुष्यात कठीण परिस्थितीत स्वत:ला धीट ठेवू शकणार नाही. हा माझ्यासाठी राहाच्या आयुष्यातील मोठा धडा आहे.”
पुढे ती मुलाखतीत म्हणाली की, “जेव्हा घर सोडलं त्यावेळी मी जेमतेम २३ वर्षांचीच होते. मी फार लवकर घराच्या बाहेर पडले. पण मी ही गोष्ट राहासोबत होऊन देणार नाही. मी शुटिंगमुळे जास्त दिवसांसाठी घराबाहेरच राहायची. ज्यावेळी मी माझ्या स्ट्रगलच्या दिवसांकडे पाहते, तेव्हा मी किती संयमी आहे, असं मला वाटतं. मला कमी वयात हे धाडस करायला मिळाल्यामुळे मी स्वतःला आणखी ओळखू लागले.” Aliya Bhatt Daughter|
“मी जेव्हा प्रेग्नेंट होते, तेव्हा लंडनमध्ये ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड चित्रपटाच्या शुटिंगवेळी माझ्या मनात अपराधीपणाची भावना येत होती. मी तीन दिवस झोपले नव्हते. मी चांगली मुलगी नाही, अशी भावना माझ्या मनात येत होती, असं आलिया मुलाखतीत म्हणाली आहे.
नुकतेच आलिया भट ने ‘जिगरा’ या सिनेमाचं शूट पूर्ण केलं आहे. शिवाय नुकतंच ती ‘मेट गाला’ मध्ये सहभागी झाली होती. तिथे तिच्या लूकचं खूप कौतुक झाले होते. त्याच्या सुंदर लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
हेही वाचा:
पंतप्रधानांनी नामांकनाची 14 मे तारीख का निवडली? ; ‘हे’ चार जण आहेत मोदींचे समर्थक





