आलिया भट्टने बिपाशा बसूच्या लेकीला दिल स्पेशल गिफ्ट

Entertainment । अभिनेत्री आलिया भट्ट आणि बिपाशा बसू त्यांच्या आयुष्यातील एक सुंदर टप्पा एन्जॉय करत आहे. बॉलीवूडच्या दोन्ही अभिनेत्रींनी काही वर्षांपूर्वी मुलींना जन्म दिला. अशात आता आलियाने बिपाशाची मुलगी देवी हिला कपडे आणि काही पुस्तके भेट दिली. बिपाशाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर पॅकेजची झलक दाखवली आहे. यासोबतच तिने आलियाचे आभारही मानले आहे.
फोटो शेअर करताना बिपाशा बसूने लिहिले की, ‘या गोंडस पोशाखासाठी आणि या अतिशय सुंदर पुस्तकासाठी आलिया भट्टचे आभार… देवी आधीच पुस्तकप्रेमी आहेत. तिला हे पुस्तक खूप आवडलं.’ यावर आता चाहते कंमेंट्स करत प्रतिक्रिया देत आहे. सोबतच देवीच्या फोटोला लाईक करत आहे. देवीला गिफ्ट दिल्याबाबत चाहते आलियाचेही कौतुक करत आहे .
बिपाशा बसूने 12 नोव्हेंबर 2022 रोजी करण सिंग ग्रोव्हरसोबत लेक देवीचे स्वागत केले. तर आलिया भट्टबद्दल बोलायचे झाले तर तिने 6 नोव्हेंबर 2022 रोजी पती रणबीर कपूरसोबत आपली लेक राहा हिचे स्वागत केले. एका मुलाखतीत आलिया भट्टने तिची मुलगी आणि पती रणबीरबद्दल सांगितले, ‘राहाचा फॅशन आणि कपड्यांचं रणबीर खूप खास काळजी घेतो; आलिया एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच मॅटर्निटी वेअर ब्रँडची मालकही आहे. आलियाची कंपनी एड ए मम्मा आहे जी कपड्यांचा ब्रँड आहे. ही कंपनी मुले आणि गर्भवती मातांसाठी बांगड्या बनवते.





