आलिया भट्ट रणबीर कपूर ‘लव्ह अँड वॉर’मध्ये दिसणार ‘एकत्र’

Entertainment । अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नेहमीच कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी त्यांच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत राहतात. आता दोघे पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. पती-पत्नी दोघांकडे सध्या अनेक मोठे प्रकल्प आहे. यातील एक म्हणजे ‘लव्ह अँड वॉर’. आता आलिया भट्टने या चित्रपटावर आपले मौन तोडत चित्रपटाच्या दिग्दर्शकाबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे. यासोबतच तिने आणखी दोन चित्रपटांबद्दलही सांगितले.
संजय लीला भन्साळी ‘लव्ह अँड वॉर’चे दिग्दर्शन करत आहे. यामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकत्र दिसणार आहेत. आलिया आणि रणबीर संजय लीला भन्साळीसोबत काम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही या दोघांनी त्याच्यासोबत चित्रपट केले होते.
संजय लीला भन्साळीसोबत आलियाने ‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये तर रणबीरने ‘सावरिया’ चित्रपटात काम केला आहे. आता आलियाने या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले की,’ती तिच्या पतीसाठी खूप आनंदी आहे. यासोबतच तिने रणबीर आणि संजय या दोघांसोबत काम करण्याची उत्सुकताही व्यक्त केली. आलिया संजय लीला भन्साळी म्हणाली,’एक प्रेक्षक म्हणून मी त्यांना आणि रणबीरला इतक्या वर्षांनंतर एकत्र काम करताना पाहून खूप उत्सुक आहे.’
यावेळी आलियाने तिच्या येणाऱ्या चित्रपटाबाबतही सांगितले,’ जिगर चित्रपटाचे दिग्दर्शक वासन बाला यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव तिने शेअर केला.’ दरम्यान,’जिगरा’मध्ये तिच्यासोबत वेदांग रैना दिसणार आहे. आलियानेही त्याचे कौतुक केले. हा चित्रपट 11 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आलिया भट्टने केली.





