Alia Bhatt: आलिया भट्टच्या पांढऱ्या ड्रेसमधील फोटोंवर दीपिकाची खास प्रतिक्रिया

Alia Bhatt: खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शक म्हणून आपला पहिला शो ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ घेऊन ओटीटीवर येत आहे. या शोच्या स्क्रीनिंगसाठी अनेक कलाकार उपस्थित होते. त्यात आलिया भट्टही पती रणबीर कपूरसोबत आली होती.
कार्यक्रमात जाण्यापूर्वी आलियाने सोशल मीडियावर पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो शेअर केले. तिच्या या फोटोंवर चाहत्यांसह तिच्या आई सोनिया राजदाननेही प्रतिक्रिया दिली. पण सगळ्यांचे लक्ष वेधले ते अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या कमेंटने. दीपिकाने आलियाला “स्टनिंग” असे लिहून तिची प्रशंसा केली.

स्क्रीनिंगला आलिया पांढऱ्या ड्रेसमध्ये आणि रणबीर पांढऱ्या ब्लेझर व काळ्या पॅंटमध्ये दिसले. दोघांनी हसत हसत फोटोग्राफर्सना पोझही दिल्या.
कामाच्या आघाडीवर दीपिका लवकरच दिग्दर्शक अॅटलीच्या A22 x A6 या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत दिसणार आहे. तर आलिया भट्ट यशराजच्या स्पाय यूनिव्हर्समधील ‘अल्फा’ चित्रपटात बॉबी देओल आणि शरवरी वाघसोबत झळकणार आहे. तसेच रणबीर कपूर आणि विक्की कौशलसोबत संजय लीला भन्साळीच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाची शूटिंगही सुरू आहे.





