Alia Bhatt : राहा च्या १८व्या वाढदिवसासाठी आलिया भट्टचं खास गिफ्ट

Alia Bhatt: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. ती आपली मुलगी राहा साठी खास गिफ्ट तयार करत आहे आणि त्याची तयारी राहा च्या जन्मापासूनच सुरू आहे.
आलिया आणि वरून धवन नुकतेच काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या “टू मच” या शोमध्ये आले होते. या वेळी काजोलने आलियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारताना सांगितले की, आलिया आपली मुलगी राहासाठी ई-मेल लिहिते. त्यावर आलियाने सांगितले की हे तिला करण जौहरकडून नाही तर तिच्या मैत्रिणी आरती आणि आणखी एका ओळखीच्या व्यक्तीकडून सुचवण्यात आलं.
आलिया म्हणाली की ती दररोज नाही, तर महिन्यातून एकदा राहासाठी मेल लिहिते. त्या मेलसोबत ती फोटो आणि छोट्या ओळी जोडते. हे मेल ती राहाला तिच्या १८व्या वाढदिवसाला भेट म्हणून देणार आहे. मात्र, राहाने जर लवकर मागितलं, तर १३-१४ व्या वर्षीही देऊ शकते, असेही आलियाने सांगितले.
आलियाला विचारले असता की तिची आई सोनी राजदान यांनीही असं काही केलं होतं का, तर ती म्हणाली की नाही. पण मला ही आयडिया खूप आवडली, म्हणूनच मी राहाच्या जन्मानंतर लगेचच हे सुरू केलं.
ट्विंकल खन्ना मस्करी करत म्हणाली की, यामुळे एक फायदा होतो, बाळाबद्दलच्या आठवणी आणि छोट्या गोष्टी कधीही विसरल्या जात नाहीत.





