Alia Bhatt : ब्लॅक ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये दिसला ‘आलिया भट्ट’चा क्लासी लूक! पाहा Photo

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या स्पेनमध्ये तिची मैत्रीण तान्या साहा गुप्ताच्या लग्नाचा आनंद घेत आहे. वेगवेगळ्या लग्न समारंभातील आलियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, तिचा फ्यूजन लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. आता तिच्या मैत्रिणीच्या लग्नाच्या दिवसाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये आलिया भट्ट कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये असलेल्या रेड कार्पेट स्टाईलमध्ये दिसत आहे.
तान्या साहाच्या इतर मैत्रिणींनीही याच रंगाची थीम फॉलो केल्यामुळे आलिया भट्टने लग्नात काळा गाऊन घातला होता. वधू, तान्या साह गुप्ता, हिने पांढरा लग्नाचा गाऊन घातला होता. व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये आलियाचा काळा गाऊन ऑफ-शोल्डर स्टाईलमध्ये बनवला आहे.
alia bhatt at her best friend’s wedding 🍓 pic.twitter.com/fq3iEVgsnL
— 🧚♀️ (@softiealiaa) May 30, 2025
अभिनेत्रीने खूप कमी मेकअप केला आहे आणि तिचे केसही बांधले आहेत. सध्या तिचा हा लूक चांगलाच चर्चेत ठरत आहे. इंस्टग्रामवर देखील अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले आहेत.
एकीकडे, आलियाचे तिच्या मैत्रिणीच्या लग्नातील अनेक लूक व्हायरल होत आहेत, तर दुसरीकडे कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील तिच्या लूकचीही चर्चा होत आहे. या कार्यक्रमातील आलियाचा साडी आणि गाऊन लूक आतापर्यंत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. आलियाने पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती.
आलिया भट्टच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, ती या वर्षी ‘अल्फा’ हा चित्रपट करत आहे. हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये आलिया एका गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसणार आहे. आलिया त्यात अॅक्शन देखील करणार आहे. आलिया भट्ट व्यतिरिक्त, शर्वरी वाघ देखील या चित्रपटात दिसणार आहे.





