गैरवर्तन प्रकरणी फुटबॉलपटूला अटक
Updated On:

पॅरिस – अल्जेरियाचा नवोदित फुटबॉलपटू फरिद अल मेलाली याला अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी फ्रान्सच्या पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून वैयक्तिक जातमुचलक्यावर त्याची सुटका करण्यात आली आहे.
येथील एंगर्स फुटबॉल क्लबकडून फरिद युरोपातील स्पर्धेत खेळतो. फरिददेखील घरातच थांबावे लागत असल्याने मानसिक नैराश्यात आहे. फरिदने आपल्या घराच्या बाल्कनीत उभे राहून समोरच्या घरात राहत असलेल्या एका महिलेकडे पाहून अश्लिल चाळे केल्याचे तेथील नागरिकांनी पाहिले व पोलिसांना कळवले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व न्यायालयात उभे केले असता त्याला जामिनावर सोडण्यात आले असले तरी त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे संकेतही स्थानिक पोलिसांनी दिले आहेत.





