चिंताजनक! अंमली पदार्थ आणि सोन्याच्या तस्करीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर वाढला

नवी दिल्ली – अंमली पदार्थ आणि सोन्याच्या तस्करीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर वाढत चालल्याचे निदर्शनास आले आहे. या अगोदर आंतरराष्ट्रीय पातळीवरील हवालामार्गे हे व्यवहार होत होते. आता टेबलकॉईन्स सारख्या क्रिप्टो करन्सीचा वापर करून हे व्यवहार पूर्ण केले जात असल्याचे रिव्हेेन्यू इंटेलिजन्स विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हवालाऐवजी क्रिप्टोच्या माध्यमातून हे व्यवहार अधिक वेगाने आणि अनामिक पद्धतीने केले जात आहेत. यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा सक्रिय करण्यात आली असून यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
यासाठी ब्लॉकचेन क्षेत्रात फॉरेन्सिक शोध तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि विकसित होण्याची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. भारत सरकारने क्रिप्टोला अजून अधिकृत मान्यता दिलेली नाही व याबद्दल आपल्या हरकती जाहीर केलेल्या आहेत.





