Siddharth and Tamannaah: सिद्धार्थ आणि तमन्नाच्या ‘द वन’ चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये पुन्हा बदल; ‘या’ दिवशी होणार रिलीज
Siddharth and Tamannaah: "बाघ की दहाड़ है... नंदी उसकी शक्ति है, और वन... उसकी कहाणी..."

Siddharth and Tamannaah: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्या आगामी ‘वन: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ अर्थात ‘द वन’ या चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे. गुरुवारी निर्मात्यांनी पुन्हा एकदा ‘वन’ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे.
निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल. निर्मात्यांनी हा निर्णय नाईलाजास्तव घेतला असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे चित्रपटाची घोषणा झाल्यापासून निर्मात्यांनी आतापर्यंत तीनवेळा याची रिलीज डेट जाहीर केली आहे.
निर्माते हा चित्रपट सर्वात आधी २०२५ मध्ये छठ पूजेच्या मुहूर्तावर रिलीज करणार होते. त्यानंतर हा चित्रपट १५ मे २०२६ रोजी रिलीज होईल अशी घोषणा करण्यात आली. तिसऱ्यांदा हा चित्रपट २८ ऑगस्ट रोजी रिलीज होणार असल्याचे सांगण्यात आले होते.
‘टॉक्सिक’ आणि ‘ईठा’ चित्रपटांसोबत टक्कर टाळण्यासाठी निर्णय?
परंतु, २८ ऑगस्टला श्रद्धा कपूरचा ‘ईठा’ आणि त्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच २६ ऑगस्टला सुपरस्टार यशचा बिग बजेट चित्रपट ‘टॉक्सिक’ रिलीज होत आहे. या दोन्ही चित्रपटांसोबत बॉक्स ऑफिसवर होणारी टक्कर टाळण्यासाठी निर्मात्यांनी ‘वन’ पुढे ढकलणेच योग्य मानले आहे. Siddharth and Tamannaah
View this post on Instagram
नुकतंच निर्मात्यांनी ‘द वन’ चित्रपटाचं नवीन मोशन पोस्टर प्रदर्शित केलं आहे. ज्यामध्ये एक माणूस हातात त्रिशूळ घेऊन उभा असून, त्याच्याभोवती एक क्रूर वाघ आणि नंदी फिरताना दिसत आहेत, “बाघ की दहाड़ है… नंदी उसकी शक्ति है, और वन… उसकी कहाणी…”, असं कॅप्शन देत या चित्रपटाचं पोस्टर चाहत्यांसोबत शेअर करण्यात आलं आहे. सिद्धार्थच्या या पोस्टवर त्याची पत्नी आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हिने देखील फायर इमोजी शेअर करत कमेंट केली आहे.
या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्याशिवाय सुनील ग्रोवर, मनीष पॉल, श्वेता तिवारी आणि अनुप सोनी यांसारखे कलाकारही यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘पंचायत’ वेब सीरिजचे दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे. Siddharth and Tamannaah
हेही वाचा:
Stock Market: सेन्सेक्स ६५३ अंकांनी तर निफ्टी १६१ अंकांनी वधारला ; बाजार पुन्हा तेजीत का परतला? वाचा





