Indrayani Aarti : आळंदीत इंद्रायणी नदी घाटावर उत्साहात इंद्रायणी आरती
Indrayani Aarti : आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समिती व आळंदी देवस्थानच्या वतीने वेदमंत्रघोष आणि हरिनाम गजरात इंद्रायणी आरती पार पडली.

Indrayani Aarti : आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समिती आणि आळंदी देवस्थानच्या वतीने वेदमंत्रघोष व हरिनाम गजरात इंद्रायणी आरती उत्साहात पार पडली. यावेळी इंद्रायणी नदीचे पूजन करण्यात आले. तसेच नदी घाटाची स्वच्छता करून रांगोळी काढण्यात आली.
धार्मिक उपक्रमासोबत सामाजिक उपक्रम राबवत भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. इंद्रायणी नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. आरतीच्या वेळी भाविक व नागरिकांनी हरिनामाचा गजर केला.
इंद्रायणी आरती सेवा समितीच्या संयोजक अनिता झुजम, सरस्वती भागवत, लता वर्तले, ताई थोरवे, मीनाक्षी जरे, काशीबाई आडकीने, जयश्री भागवत, नीलम कुरधोंडकर, पुष्पा लेंडघर, महासंघ अध्यक्षा सुवर्णा काळे, स्वाती कांबळे, अश्विनी लिके, संपदा मेंडजोगी, विमल सकटे, इंदुबाई सरडे, सखुबाई मुंढे, सावित्री गायकवाड, तारामती गोरे, गोविंद ठाकूर यांच्यासह भाविक व नागरिक उपस्थित होते.





