प्रभात वृत्तसेवा आळंदी – आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 शांततेत व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नगरपालिकेने पूर्ण तयारी केली आहे. या अनुषंगाने, आज सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी नगरपालिका कर्मचार्यांसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या.निवडणूक प्रक्रियेतील बारकावे समजावून सांगताना, अधिकार्यांनी कर्मचार्यांकडून येणार्या शंकांचे निरसन केले. तसेच, निवडणुकीच्या कामात काही त्रुटी आढळल्यास त्या त्वरित कशा दूर करायच्या, याबद्दल मार्गदर्शन केले. या बैठकीमुळे कर्मचार्यांच्या तयारीला अंतिम स्वरूप मिळाले असून, आळंदी नगरपरिषद प्रशासन ही निवडणूक यशस्वी करण्याकरिता सज्ज झाले आहे. आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपद आणि 10 नगरसेवकांच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आळंदी नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले आहे. शहराच्या विविध भागात 30 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. मुख्य गावठाणातील खेड तालुका हद्दीत 20 आणि नदी पलीकडे 10 मतदान केंद्रे आहेत.नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून प्रशांत कु-हाडे तर राष्ट्रवादीकडून प्रकाश कु-हाडे आणि दोन अपक्ष असे चौरंगी लढत होत आहे. तर नगरसेवकपदाच्या 21 जागांसाठी एक ते नऊ प्रभागातून प्रत्येकी दोन आणि दहाव्या प्रभागामध्ये तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. काही प्रभागात भाजप राष्ट्रवादी काही प्रभागात भाजप शिवसेना अशी लढत होत आहे. वास्तविक राज्य सरकारमध्ये हे तीनही पक्ष महायुतीमध्ये गणले जातात. मात्र आळंदी नगर परिषद मध्ये एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत. दृष्टिक्षेपात महत्त्वाची आकडेवारी- -एकूण मतदार: 25,331 -स्त्री मतदार: 11,827 -पुरुष मतदार: 13,501 -अन्य: 03 एकूण मतदान केंद्र संख्या: 30 (हवेली 10, खेड 20) -ईव्हीएम: कंट्रोल युनिट 30, बॅलेट युनिट 35 -निवडणूक कर्मचार्यांची टीम संख्या: एकूण टीम 30, राखीव टीम 5 -एका टीममध्ये: 06 लोक. -अधिकृत पत्रकारांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था