मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी घेतले माऊलींचे दर्शन
Updated On:

आळंदी: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले. हे त्यांचे पंढरपूरच्या वारीचे 32 वे वर्ष आहे. यावेळी आळंदीत त्यांनी मराठी भाषेच्या समर्थनार्थ ठाम भूमिका मांडली. “मी पंढरीचा वारकरी आहे, त्यामुळे महाराष्ट्रात आल्यावर मी नेहमी मराठी,” असे त्यांनी जाहीरपणे सांगितले.
दिग्विजय सिंह यांच्यासोबत आमदार हेमंत ओगले, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील, अभयजी छाजेड, डॉ. राका, बाबुलाल घुंडरे, नंदकुमार वडगावकर, भास्कर तुळवे, संदीप नाईकरे, योगेश सातपुते, संदेश नवले आणि संजय रावडे उपस्थित होते.





