आळंदी : इंद्रायणी पात्रात हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
Updated On:

आळंदी – आळंदीलगत असणाऱ्या केळगाव हद्दीतील सिद्धबेट परिसरात 24 वर्षीय तरुणाचे हातपाय दोरीने बांधून इंद्रायणी नदीत फेकून ठार केल्याची घटना उघड झाल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.
ही घटना सोमवारी (दि.9) विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पाठीमागे घडली आहे. विनायक बाळासाहेब बोरुडे (वय 24 रा. गोरेगाव, ता. पारनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान आळंदी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.





