आळंदी: ज्ञानेश्वर विद्यालयाच्या १६ विद्यार्थ्यांचे एनएमएमएस आणि सारथी शिष्यवृत्तीत यश

आळंदी – श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, आळंदी देवाची येथील १६ विद्यार्थ्यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षा (एनएमएमएस) आणि सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवत शिष्यवृत्ती पटकावली असून, ही माहिती संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी जाहीर केली.
इयत्ता आठवीतील या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये आदेश कुडेकर, अभय साळवे, रागिनी मोरे, वैभवी मुंगसे, राधिका फपाळ, कल्याणी कराळे, मानस कुऱ्हाडे, तन्मय तौर, संस्कृती नवले, रवीकुमार डोंगरे, गायत्री लोहोर, आदित्य गुंड, भावार्थ घाडगे, प्रतीक्षा शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि अथर्व गवांदे यांचा समावेश आहे. या सर्वांना गुणवत्ता विभागप्रमुख नारायण पिंगळे यांनी मार्गदर्शन करून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवले.
या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर आणि अनुजायिनी राजहंस यांनी त्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे विद्यालयाची शैक्षणिक परंपरा आणि गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.





