Akshaye Khanna : अक्षय खन्नाचा ‘महाकाली’ चित्रपटातील जबरदस्त अंदाज, थक्क करणारा नवा लुक
Akshaye Khanna : अक्षय खन्नाच्या 'महाकाली' या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता

Akshaye Khanna : अभिनेता अक्षय खन्नाने ‘धुरंधर’ चित्रपटात अक्षय खन्नाने ‘रहमान डकैत’ ची भूमिका साकारली होती आणि चित्रपटाच्या पहिल्या भागात त्याच्या या भूमिकेची खूप चर्चा झाली. ‘धुरंधर’ या चित्रपटाद्वारे अक्षय खन्नाचे धमाकेदार कमबॅक झाले.
यानंतर आता अक्षय खन्नाच्या ‘महाकाली’ या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या चित्रपटासंबंधी एक मोठी अपडेट दिली आहे. मेकर्सने अक्षय खन्नाचा शुक्राचार्यांच्या भूमिकेतील नवीन लूक सर्वांसमोर आणला आहे.
या चित्रपटात अक्षय खन्ना असुरांचे गुरू ‘शुक्राचार्य’ यांच्या एका अत्यंत शक्तिशाली आणि नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. ‘आरकेडी स्टुडिओ’ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लूक शेअर केला, ज्यामध्ये ते ‘शुक्राचार्य’ यांच्या अवतारात दिसत आहेत. निर्मात्यांनी पोस्ट करत लिहिले, “२४ ऑगस्ट – आता सुरू होणार अंत,” असं लिहिलं आहे.
24th August – THE END BEGINS!#Mahakali🔱 #PVCU@PrasanthVarma #AkshayeKhanna@PujaKolluru @sriyareddy #BhoomiShetty #RohitSaraf @khushsundar #RakeshBedi @samuthirakanip @jitin0804 #RajatKapoor #Nassar #MuraliSharma #Prudhviraj pic.twitter.com/DH9VcMJ52a
— RKD Studios (@RKDStudios) August 19, 2026
अक्षय खन्नाच्या लूकमध्ये अभिनेत्याचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन दिसतं आहे. लांबसडक पांढरे केस, कपाळावर भस्म अशा अंदाजात अक्षय खन्ना पाहायला मिळत आहे. असुरांचे गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘शुक्राचार्य’ यांच्या भूमिकेत अक्षय खन्ना एक वेगळ्याच प्रकारची तीव्रता आणि गांभीर्य या भूमिकेतून आणण्याची शक्यता आहे. Akshaye Khanna
आर.के. स्टुडिओच्या बॅनरखाली आर.के. दुग्गल हा चित्रपट प्रस्तुत करत असून रिवाज रमेश दुग्गल याचे निर्माते आहेत. चित्रपटाचे क्रिएटर प्रशांत वर्मा आहेत तर दिग्दर्शन पूजा अपर्णा कोल्लूरू करत आहेत. अक्षय खन्नांव्यतिरिक्त या चित्रपटात भूमी शेट्टी, रोहित सराफ आणि इतर अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत.
नुकतंच अक्षय खन्ना नेटफ्लिक्सवरील ‘इक्का’ या चित्रपटातही दिसला होता, ज्यामध्ये त्याच्यासोबत सनी देओल मुख्य भूमिकेत होता. यानंतर आता अक्षय खन्ना ‘शुक्राचार्य’च्या भूमिकेत दिसणार आहे. Akshaye Khanna
हेही वाचा:
Nevase News : जमीन घेण्यासाठी तगादा, सुनेला सासरच्या लोकांकडून मारहाण; 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल





