अक्षयला मीरा बोरवणकरांना भेटायचे होते; माहिती अधिकारातून माहिती उघड
Updated On:

मुंबई : माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांच्या जनहित याचिकेतील एका मुद्द्यानुसार, अक्षय शिंदे याने तुरुंगात असताना आपल्याला आयपीएस मीरा बोरवणकर यांना भेटण्याची इच्छा पोलिसांकडे बोलून दाखवली होती, असे म्हटले आहे.
आरोपी अक्षय शिंदे हा उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष समितीपुढे गेला, तर प्रकरण वेगळ्याच वळणार जाईल, या भीतीने त्याचा एन्काऊंटर झाल्याचा गंभीर आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. तसेच जनहित याचिकेतून ट्रस्टी आणि शाळेतून सीसीटीव्ही गायब करणारा कर्मचारी अद्याप फरार असल्याने ठाणे पोलीस आणि एसआयटीच्या कारभारावरही सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.





