Akshay Shinde Encounter : आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर जितेंद्र आव्हाड म्हणतात, “हे अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक”

Akshay Shinde Encounter | Jitendra Awhad : बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. बदलापुरातील एका शाळेत काम करणाऱ्या अक्षय शिंदे याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. हे प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचलं होतं. बदलापूरकरांनी या घटनेच्या निषेधार्थ रेल्वे रोकली होती.
याशिवाय कडकडीत बंद पाळला होता. या आरोपीला फाशी देण्याची मागणी नागरिकांनी केली होती. अक्षय शिंदे याने पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात विरोधक शंका व्यक्त करत आहेत. तर सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, या घटनेवर आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटकरत भाष्य केलं आहे. जितेंद्र म्हणाले की, “आरोपीला न्यायालयाच्या दारात नेऊन त्याचा एन्काऊंटर घडवून आणणं हा न्यायव्यवस्थेचा अपमान आहे..! संपूर्ण घटनेची तपशीलवार माहिती घेऊन त्या अनुषंगाने गुन्हेगारांना शिक्षा व पीडितांना न्याय देण्यासाठी म्हणून न्यायपालिका भूमिका बजावत असते.
आरोपीला न्यायालयाच्या दारात नेऊन त्याचा Encounter घडवून आणणं हा न्यायव्यवस्थेचा अपमान आहे..!
संपूर्ण घटनेची तपशीलवार माहिती घेऊन त्या अनुषंगाने गुन्हेगारांना शिक्षा व पीडितांना न्याय देण्यासाठी म्हणून न्यायपालिका भूमिका बजावत असते. पण याउलट युपी-बिहारची एन्काऊंटर संस्कृती…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 23, 2024
पण याउलट युपी-बिहारची एन्काऊंटर संस्कृती महाराष्ट्रात आणण्याचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. कायदा गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठीच आहे, पण कायद्याचा गैरवापर जेव्हा केला जातो तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित होतात. कुणी म्हणतंय की अक्षयने आत्महत्येचा प्रयत्न केला, कुणी म्हणतंय की पोलिसांनी एन्काऊंटर केलं…
स्वसंरक्षण की हत्या?
एखाद्या हायप्रोफाईल प्रकरणातील आरोपीला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना सहसा अनेक पोलिस कर्मचारी बरोबर असतात. पोलिसांच्या गरड्यात असताना बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पोलिसांवरच गोळ्या झाडतो, यावर कुणाचा विश्वास बसेल?… pic.twitter.com/IF1MVmwJlw
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) September 23, 2024
आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तर पोलिस काय करत होते? पोलिसांना एन्काऊंटरचे आदेश कुणी दिले? गोळ्या कुठे लागल्या? हे प्रकरण संशयास्पद असून याची न्यायिक चौकशी व्हायलाच हवी. पण त्यासोबतच, महत्त्वाचं म्हणजे, निवडणुका तोंडावर असताना अशा हिंसक व न्यायविरोधी घटना घडवून आणून लोकांच्या भावनांशी खेळणं हे अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात नक्की काय लपवलं जातंय, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय?





