अक्षय-माधवन आणि अनन्या पोहचले सुवर्ण मंदिरात; ‘केसरी २’च्या रिलीजआधी घेतले दर्शन

Kesari Chapter 2 | बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘केसरी चॅप्टर 2’ असे त्याच्या चित्रपटाचे नाव आहे. नुकतेच या चित्रपटाच्या टीमने अमृतसर मधील सुवर्ण मंदिराला भेट दिली. यावेळी अक्षयसोबत अभिनेता आर माधवन आणि अभिनेत्री अनन्या पांडे देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.
नुकतेच अन्ययाने सुवर्ण मंदिरातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह” तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सुवर्ण मंदिराला भेट देताना अनन्या पांडेने बेबी पिंक रंगाचा फ्लोरल प्रिंटेड ड्रेस परिधान केला होता. तर अक्षय कुमारने निळ्या रंगाच्या शर्ट आणि माधवनने पांढरा कुर्ता घातला होता. तिघेही हात जोडून उभे असलेले पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, प्रेक्षकांनी अक्षयच्या ‘केसरी’ या सिनेमाच भरभरून कौतुक केले होतं. यानंतर आता केसरी 2 रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाच्या पहिला भागाची कथा ही सारागढी येथे झालेल्या ऐतिहासिक युद्धाच्या सत्यकथेवर आधारित होती. ज्यामध्ये २१ शिख धर्मियांनी इंग्रजांनशी लढा दिला होता. या सिनेमात अक्षय शूर हवालदार ईशर सिंगची भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
;
केसरी 2 मध्ये अक्षयने शंकरन नायर या वकिलाच्या भूमिका साकारलेली आहे. तर ‘केसरी चॅप्टर 2’ मध्ये अनन्या पांडे युवा वकील दिलरीत गिलच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘केसरी चॅप्टर 2’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण सिंग यांनी केले आहे. या सिनेमाची कथा जालियनवाला बाग हत्याकांडवर आधारित आहे. हा सिनेमा 18 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
हेही वाचा :
भारतीय शेअर बाजारात उसळी! सेन्सेक्स १५०० अंकांनी वधारला ; निफ्टी २३२५० च्या पार





