अहमदनगर – महाराष्ट्र केसरी किताब निवड चाचणी कुस्ती स्पर्धा 27 ऑक्टोबरला

नगर – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ संलग्न अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाची बैठक जिल्हाध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महाराष्ट्र केसरी किताब निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे 27 ऑक्टोबर रोजी गंगा उद्यान जवळील खेळाच्या मैदानावर होणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खा. रामदास तडस यांनी अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघ हा राज्य कुस्तीगीर संघाशी संलग्न आहे. असे पत्र दिले आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव संतोष भुजबळ यांनी दिली.
नगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष आ. संग्राम जगताप उपस्थित होते. यावेळी उद्योजक राजेंद्र चोपडा, प्रा माणिकराव विधाते, नगरसेवक अविनाश घुले, अजिंक्य बोरकर, शिवाजी चव्हाण, महेश बुचूडे, महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के, गुलाबराव बर्डे, अजय धोपावकर, मधुकर उचळे, अर्जुनदेवा शेळके, रवींद्र वाघ, प्रवीण घुले, शिवाजीराव कराळे, बबनराव काशीद, बापू भीटे, युवराज करंजुले आदी उपस्थित होते.
आ.जगताप म्हणाले, नगर जिल्हा हा देशात कुस्ती क्षेत्रामध्ये नावाजलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील युवा खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून काम करून, राज्य शासनाच्या खेळाडूंसाठी असणाऱ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाणार आहे. नगर जिल्ह्याच्या कुस्ती क्षेत्राला नावलौकिक मिळून देऊ, असे ते म्हणाले.





