अक्षय कुमारचा ‘हा’ सत्य घटनेवरील चित्रपट जाणार Oscar ला ! निर्मात्यांनी केली मोठी घोषणा

मुंबई – अक्षय कुमारचा ‘मिशन राणीगंज’ (Mission raniganj) हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. एका सत्य घटनेने प्रेरित असलेल्या या चित्रपटाला समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. चित्रपट पाहून चित्रपटगृहातून बाहेर प्रेक्षकांनीही त्याचे कौतुक केले. सध्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 (Worldcup 2023) सुरु असल्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अतिशय संथ गतीने कमाई करत आहे.आता ‘मिशन राणीगंज’चे निर्माते अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) चित्रपटाला सर्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या ऑस्कर पुरस्कारासाठी घेऊन जाणार आहेत.
‘मिशन राणीगंज’ची कथा लाखो लोकांना प्रेरणा देते. जसवंत सिंग गिल यांनी राणीगंज कोळसा खाणीतून ६५ मजुरांची कशी सुटका केली होती, या खऱ्या नायकाची कहाणी अक्षय कुमारने आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांना दाखवली. आता समोर आलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे निर्माते ‘मिशन राणीगंज’ ऑस्कर (Oscars ) अकादमीला सादर करणार आहेत. (Akshay Kumar’s film will go to Oscar)
सध्या ऑस्कर अवॉर्डसाठी देशातील अधिकृत एंट्री मल्याळम चित्रपट ‘2018’ साठी आहे, ज्याची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली होती. या चित्रपटाची कथा केरळमधील पुरावर आधारित आहे. आता आरआरआरच्या निर्मात्यांप्रमाणेच त्यांनी मिशन राणीगंज ऑस्कर पुरस्कारांसाठी स्वतंत्रपणे सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील वर्षी होणार ऑस्कर
दरवर्षी चाहते ऑस्कर पुरस्काराची आतुरतेने वाट पाहत असतात. पुढील वर्षी, 96 वा अकादमी पुरस्कार 10 मार्च, 2024 रोजी लॉस एंजेलिसमध्ये आयोजित केले जातील. या प्रतिष्ठित पुरस्कारांच्या यादीत कोणत्या हॉलीवूड आणि भारतीय चित्रपटांनी नामांकनात आपले स्थान निर्माण केले आहे, याची घोषणा 23 जानेवारीला होणार आहे.




