हातात गिटार घेऊन नाचताना दिसला अक्षय कुमार; अभिनेत्याची जॉली स्टाईल पाहून पत्नी ट्विंकल खन्ना म्हणाली…

मुंबई – मिशन मंगल, हाऊसफुल, रुस्तम, पॅड मॅन, टॉयलेट एक प्रेम कथा आणि लक्ष्मी अश्या सुपरहिट आणि दर्जेदार चित्रपटांमधून सिनेरसिकांचे मनोरंजन करणारा बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच, अभिनेता ‘अक्षय कुमार’ हा इंडस्ट्रीतील सर्वात व्यस्त कलाकारांपैकी एक आहे. अगदी करोनाव्हायरसच्या काळात सुद्धा अक्षयकुमार आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. म्हणूनच, आपल्या हरहुन्नरी अभिनयाने अक्षयने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे. सोशल मीडियावर अक्षय कुमारचा मोठा चाहता वर्ग असून, इंस्टाग्रामवर त्याचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.
दरम्यान, नुकतंच खिलाडी कुमारने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सध्या त्याचा हा व्हिडिओ सर्वत्र तुफान व्हायरल होत असून, फॅन्सला देखील आपल्या लाडक्या अक्षयचा हा अनोखा अंदाज चांगलाच आवडला आहे. आणि त्यामुळेच नेटकरी अक्षयच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
शेअर केलेल्या या व्हिडिओत अक्षय गोव्यात ख्रिसमस साजरा करताना दिसत आहे. यादरम्यान अक्षय हातात गिटार घेऊन ‘आय वाना विश यू अ मेरी ख्रिसमस..’ गाताना नाचत आहे. यावेळी अक्षय पूर्ण मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने देखील या व्हिडिओवर एक भन्नाट कमेंट केली आहे.
ट्विंकलने प्रतिक्रिया दिली की, ‘मला खूप आनंद झाला की मी त्या वेळेच्या खोलीत होते आणि मला अक्षयचा डान्स दिसला नाही.’ याशिवाय चाहत्यांनी आपल्या लाडक्या अक्षयला मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयची ही जॉली स्टाईल चाहत्यांना खूप आवडते.
अक्षय कुमारसाठी हे वर्ष खास राहिले नाही. या वर्षी त्याचे रक्षाबंधन, रामसेतू आणि सम्राट पृथ्वीराज सारखे चित्रपट रिलीज झाले आहेत परंतु एकाही चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. सध्या अक्षय त्याच्या आगामी सिनेमांच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे.





