अक्षय कुमारचे वाढदिवसानिमित्त चाहत्यांना सरप्राइज; आगामी चित्रपटाची दाखवली झलक

Bhooth Bangla First Look Out | बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना मोठे सरप्राइज दिले आहे. अक्षय कुमारने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘भूत बंगला’ असे या चित्रपटाचे नाव आहे. अक्षय कुमारने ‘भूत बांगला’चा फर्स्ट लूक रिलीज केला आहे.
प्रियदर्शन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. विशेष म्हणजे, अक्षय आणि प्रियदर्शन 14 वर्षानंतर पुन्हा एकत्र आले आहे. 2010 साली आलेल्या ‘खट्टा मिठा’ सिनेमानंतर ही जोडी एकत्र दिसणार आहे. आगामी चित्रपटाची पहिली झलक अक्षयने इनस्टाग्रामवर शेअर केली आहे.
सोबतच अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले, “माझ्या वाढदिवशी वर्षानुवर्षे तुम्ही देत असलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद! ‘भूत बांगला’च्या फर्स्ट लुकसह हे वर्ष साजरे करा! 14 वर्षांनंतर प्रियदर्शनसोबत पुन्हा एकत्र येण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. हा अतुलनीय प्रवास तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.”
View this post on Instagram
दरम्यान, गणेश चतुर्थीच्या दिवशी अक्षय कुमारने मोशन पोस्टरसह 9 सप्टेंबर रोजी मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले होते. अक्षयने या पोस्टने चाहत्यांची उत्कंठा वाढवली होती. त्यानुसार तो एका हॉरर चित्रपटात झळकणार असल्याचा अंदाज लावला जात होतो. अखेर त्याने ‘भूत बंगला’ या चित्रपटाची घोषणा केली. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे, ज्याचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.
प्रियदर्शन आणि अक्षय कुमारच्या जोडीने अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. त्यांनी ‘हेरा फेरी’, ‘गरम मसाला’, ‘भागम भाग’, ‘भूल भुलैया’ यांसारखे उत्कृष्ट चित्रपट केले. त्यानंतर आता ही जोडी पुन्हा एकत्र नव्या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज होणार आहे.
हेही वाचा:





