अक्षय कुमार टीव्हीवर कमबॅक करण्यासाठी सज्ज; रिॲलिटी शोचे होस्टिंग करणार

Akshay Kumar | बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार टीव्हीवर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. अक्षय कुमार एक नवीन शो घेऊन येत आहे. या धमाकेदार शो चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘व्हील ऑफ फॉर्च्युन’ असं या शोचं नाव असून यात सर्वसामान्यांना त्यांचं नशीब पालटण्याची संधी मिळणार आहे.
‘व्हील ऑफ फॉर्च्युन‘च्या प्रोमोमध्ये दिसते की, वकील मृत्यूपत्राचं वाचन करत आहेत. त्यांचं कुटुंबीय समोर बसले आहेत. तर अक्षय कुमार नोकराच्या भूमिकेत आहे. पण, आपली कोट्यवधींची संपत्ती मुलगा रामच्या नावावर न करता नोकर रामूच्या नावावर केल्याचं दिसत आहे.
पुढे असं दाखवण्यात आले की, रामू बनलेला अक्षय कुमार मोठ्या शिताफिने रामवर रामू असं त्याच्या मालकाकडून लिहून घेतो. प्रोमोमध्ये अक्षय कुमार म्हणतो की “एक ऊकाराने सगळं काही बदललं. शब्दांची कारीगरी जादू करू शकते. आता एक एक अक्षर महत्त्वाचं ठरणार, जेव्हा हा जादूचा चक्कर घुमणार”. एका बंगल्यातला नोकर कसा मालक बनतो आणि मालक हा नोकर हे प्रोमोत दिसते. Akshay Kumar |
View this post on Instagram
लवकरच सोनी टीव्हीवर ‘व्हील ऑफ फॉर्च्युन’ हा नवा रिएलिटी शो सुरू होणार आहे. या शोचं सूत्रसंचालन अक्षय कुमार करणार आहे. अमेरिकेतील हा सगळ्यात गाजलेला टीव्ही शो आहे. या शोला तब्बल ८ एमी अवॉर्ड्स मिळाले आहेत. शोची रिलीज डेट अद्याप जाहीर झाली नाही. मात्र या शोबद्दलची चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे. Akshay Kumar |
हेही वाचा:





