अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या जोडीची कमाल; ‘जॉली एलएलबी ३’ने पार केला १०० कोटींचा टप्पा

Jolly LLB 3 | बॉलीवूडची लोकप्रिय कोर्टरूम कॉमेडी-ड्रामा मालिका ‘जॉली एलएलबी’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘जॉली एलएलबी ३’ या तिसऱ्या भागात अक्षय कुमार आणि अर्शद वारसी हे दोघेही एकत्र दिसत आहेत. हा चित्रपट 19 सप्टेंबरला रिलीज झाला. चित्रपटाने 13 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला.
चित्रपटाचे एकूण कलेक्शन तब्बल 100.85 कोटी झाले आहे. ‘जॉली एलएलबी 3’ चे बजेट 120 कोटी आहे. ‘जॉली एलएलबी 3’ने पहिल्या आठवड्यात 74 कोटी , दुसऱ्या आठवड्यात 26 कोटींहून अधिक कमाई केली आहे. अक्षयचा 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा ‘जॉली एलएलबी 3’ हा 15वा चित्रपट आहे. याआधी हाऊसफुल २, राउडी राठोड, हॉलिडे, एअरलिफ्ट, हाऊसफुल ३, रुस्तम, जॉली एलएलबी २ ,टॉयलेट, गोल्ड, २.०, केसरी, हाऊसफुल ४, सूर्यवंशी आणि स्काय फोर्स यांचा समावेश आहे. Jolly LLB 3 |
‘जॉली एलएलबी 3’हा कॉमेडी कोर्टरूम ड्रामा आहे. चित्रपटात अक्षय कुमार आणि अर्शद वारसी वकिलांच्या भूमिकेत दिसत आहे. ‘जॉली एलएलबी 3’मध्ये सौरभ शुक्ला, अमृता राव आणि हुमा कुरेशी या कलाकारांचा समावेश आहे. Jolly LLB 3 |
‘जॉली विरुद्ध जॉली’
या वेळी कथानकात अक्षय कुमार आणि अर्शद वारसी आमनेसामने येतात. कोर्टरूममधील त्यांचा विनोदी वाद आणि त्यातून उभा राहणारा गंभीर प्रश्न या गोष्टींमुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आहेत. या चित्रपटाला सेन्सॉर मंडळाकडून U/A प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. काही दृश्यांमध्ये सौम्य बदल करण्यात आले आहेत. Jolly LLB 3 |
हेही वाचा:




