Akshay Kumar: बॉलीवूड कपल कैटरीना कैफ आणि विक्की कौशल लवकरच आई बाबा होणार आहेत. अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रेग्नन्सीबद्दल चर्चा सुरू होती. मंगळवारी या दोघांनीच सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली. कतरिनाचा बेबी बंप दिसणाऱ्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला. अक्षय कुमारची मजेशीर कमेंट हुमा कुरैशी, सोनाक्षी सिन्हा, दीपिका पदुकोण यांसारख्या कलाकारांनी शुभेच्छा दिल्या, पण अक्षय कुमारच्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याने मजेदार अंदाजात लिहिलं, “तुमच्या दोघांसाठी खूप आनंद आहे. मला खात्री आहे की तुम्ही बेस्ट पेरेंट्स ठराल. फक्त बाळाला इंग्रजी आणि पंजाबी दोन्ही भाषा समान शिकवा. भरपूर प्रेम आणि आशीर्वाद. जय महादेव!” कैटरीना-विक्कीचा प्रवास कैटरीना आणि विक्कीने ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्न केलं होतं. दोघांची भेट दिग्दर्शक जोया अख्तरच्या पार्टीत झाली होती. आता तीन वर्षांनंतर त्यांनी पालक होण्याची गुड न्यूज दिली आहे. सध्या अक्षय कुमार आपल्या लोकप्रिय फ्रेंचायझीतील चित्रपट ‘जॉली एलएलबी ३’ मुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत अर्शद वारसी महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत १०० कोटींच्या क्लबकडे वाटचाल सुरू केली आहे.