Akshay Kumar: अक्षय कुमार तिसऱ्यांदा ‘या’ अभिनेत्रीसोबत शेअर करणार स्क्रीन
Akshay Kumar : दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या चित्रपटात होणार एन्ट्री

Akshay Kumar : दिग्दर्शक प्रियदर्शन आणि सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमार या जोडीचा ‘भूत बंगला’ आणि ‘हैवान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. यानंतर आता हे दोघे आणखी एका नव्या चित्रपटातून समोर येणार आहे. विशेष म्हणजे प्रियदर्शन यांच्या पुढील चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकरची एन्ट्री होणार आहे.
एका रिपोर्टनुसार, अभिनेत्री भूमि पेडणेकरची सिनेमात वर्णी लागली आहे. अद्याप यावर मेकर्सने किंवा अक्षय, भूमिकडून प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र हे निश्चित झाल्यास अक्षय आणि भूमिची जोडी ४ वर्षांनी एकत्र येणार आहे. २०२२ साली आलेल्या ‘रक्षा बंधन’ सिनेमात ते शेवटचे दिसले होते.
२०१७ साली आलेल्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ सिनेमात अक्षय आणि भूमिची जोडी दिसली होती. हा सिनेमा आणि त्यांची केमिस्ट्री खूप गाजली. आता तिसऱ्यांदा दोघं एकत्र काम करण्यासाठी सज्ज आहेत. २०२४ साली आलेल्या अक्षय कुमारच्या ‘खेल खेल में’मध्ये भूमिने कॅमिओ केला होता.
भूमी पेडणेकरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री शेवटची ‘दलदल’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. ही सीरिज या वर्षाच्या सुरुवातीला प्राइम व्हिडिओवर रिलीज झाली होती, ज्यामध्ये तिने एसीपी रीता फारियाची भूमिका साकारली होती.
सध्या अभिनेत्री धार्मिक यात्रेवर आहे. नुकतीच ती शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी गेली होती. यानंतर भूमी उज्जैनमध्ये भगवान महाकाल आणि तिरुपती बालाजी यांच्या दर्शनासाठीही पोहोचली होती.
अक्षय कुमारच्या वर्क फ्रंटवर नजर टाकल्यास, त्याचा ‘हैवान’ हा चित्रपट सप्टेंबरमध्ये रिलीज झाला होता. यामध्ये त्याच्यासोबत सैफ अली खानही मुख्य भूमिकेत होता. मात्र, ‘हैवान’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आता अक्षय, अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांच्या ‘गोलमाल ५’ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा:






