अक्षय केळकर अखेर अडकला विवाहबंधनात; १० वर्षांच्या रिलेशनशीपनंतर बांधली लग्नगाठ

Akshay Kelkar | ‘बिग बॉस मराठी 4’ चा विजेता अक्षय केळकर अखेर विवाहबंधनात अडकला आहे. सध्या त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अक्षय केळकरने 9 मे रोजी लग्नगाठ बांधली आहे. त्याने गर्लफ्रेंड साधना काकतकरसोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अक्षय साधनाला प्रेमाने रमा अशी हाक मारतो. अक्षय आणि साधना 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर आता त्यांनी लग्नगाठ बांधली आहे.
अक्षय-साधनाचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला आहे. लग्नासाठी दोघांनी पारंपरिक लूक केला होता. लग्नात साधनाने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा, केसात गजरा, नाकात नथ आणि मॅचिंग दागिने घालून तिने हा लूक पूर्ण केला होता. तर अक्षयने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. Akshay Kelkar |
View this post on Instagram
अक्षय केळकरने लग्नाचा व्हिडीओ टाकत त्याला ‘शुभ मंगल सावधान…’,असे कॅप्शन दिले आहे. सध्या अक्षय केळकरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. Akshay Kelkar |
अक्षय केळकरची बायको साधना काकतकर ही एक लोकप्रिय गायिका आहे. तिने आजवर अनेक गाणी गायली आहेत. यात मेतरा, आनंदाचे गाव, नाखवा या सारख्या गाण्यांचा समावेश आहे. तर अक्षय केळकरने अलीकडेच ‘अबीर गुलाल’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तसेच तो नुकताच ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. बिग बॉसमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. Akshay Kelkar |
हेही वाचा:





