जटा-भस्म धारण करून अक्षयने साकारले महादेवाचे रूप; ‘OMG 2’चा टिझर पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा…

मुंबई – अभिनेता अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या चित्रपटाचा अधिकृत टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अक्षय कुमार खूप चर्चेत आहे.
‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटात अक्षय भगवान शिवाच्या (महादेव) भूमिकेत दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर बॅक टू बॅक फ्लॉप दिल्यानंतर, यावेळी अक्षय कुमारला भगवान शिवाच्या अवतारात पाहून त्याचे चाहते खूप चांगलेच खुश झाले आहेत.
1 मिनिट 26 सेकंदाच्या या टीझरमध्ये अक्षय कुमारच्या ग्रॅंड एंट्रीने धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अक्षय कुमार लांब केस, कपाळावर भस्म आणि गळ्यात रुद्राक्ष धारण केलेला दिसला होता. तर आता टीझरमध्ये अक्षयचा एकदम वेगळा लूक आहे.
अक्षय कुमारने लांब पट्ट्या, कपाळावर राख आणि गंगेत डुबकी घेऊन भव्य एंट्री केली. यादरम्यान, शिवभक्तीत तल्लीन झालेल्या पंकज त्रिपाठीच्या डोक्यावर हात ठेवून अक्षय म्हणाला: “राखी विश्वास तू है शिव का दास…’ या संवादाने त्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.
2012 मध्ये आलेल्या OMG चित्रपटात नास्तिक कांजीलाल मेहता यांची कथा दाखवण्यात आली होती, मात्र या सिक्वेलमध्ये देवावर अतूट श्रद्धा असलेल्या पंकज त्रिपाठीची कथा दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी कांती शरण मुदगल यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री यामी गौतम, पंकज त्रिपाठी आणि अरुण गोविल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.





