Akshara singh : थोड़ा दर्द, थोड़ा ग्लैम.! अभिनेत्री अक्षरा सिंगने दिली नवीन हिंट, फॅन्स म्हणाले….
Akshara singh : चित्रपट आणि गाण्यांव्यतिरिक्त, भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी देखील ओळखली जाते. ती सोशल मीडियावर चाहत्यांना तिच्या अपडेट्स देत राहते. यावेळी तिने तिच्या आरोग्याची अपडेट दिली आहे.
अक्षरा सिंहचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल झाला होता आणि तिने एका व्हिडिओद्वारे याबद्दल सांगितले आहे. तिने काही फोटो देखील शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिला ग्लुकोज देण्यात आल्याचे दिसून येते.
दि. २० ऑगस्ट रोजी अक्षरा सिंगचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये ती तिच्या ‘मिस्टेक हो गया’ या नवीन गाण्याबद्दल बोलत होती. तिने सांगितले की ती गेल्या काही दिवसांपासून आजारी होती आणि खूप वेदना सहन करत होती, पण आता ती बरी आहे.
यानंतर अक्षराने काही फोटोही शेअर केले. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, ‘थोडासा त्रास, थोडासा ग्लॅमरस… (थोड़ा दर्द, थोड़ा ग्लैम… ) आणि शूटसाठी पूर्ण तयार.’ असं ती यामध्ये म्हणाली.
View this post on Instagram
चाहत्यांना अक्षरा सिंगचे हे फोटो खूप आवडत आहेत. बहुतेक लोकांनी कमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजी शेअर केले आहेत आणि लोक अभिनेत्रीबद्दल काळजीतही आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘मॅडम तुम्हाला काय झाले आहे? कृपया स्वतःची काळजी घ्या.’
त्याच वेळी, दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘लवकर बरे व्हा मॅडम.’ अक्षरा सिंगने स्टोरीवर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला, ज्यामध्ये तिला ग्लुकोज होत असल्याचे दिसून आले. सध्या अभिनेत्री ठीक आहे.
अक्षरा सिंगची नवीनतम दोन गाणी कोणती?
दि. १७ ऑगस्ट रोजी ‘मिस्टेक हो गया’ आणि आज म्हणजेच दि. २१ ऑगस्ट रोजी ‘तीज के व्रत हा पावन’ अशा दोन वेगवेगळ्या शैलीतील गाणी रिलीज झाली आहेत. ही दोन्ही गाणी अक्षरा सिंगने गायली आहेत, ती तिच्यावर चित्रित केली आहेत आणि त्यांची निर्माती देखील अक्षरा सिंग आहे.
ही दोन्ही गाणी अक्षरा सिंगच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आली आहेत आणि चाहत्यांना दोन्ही गाणी खूप आवडत आहेत. अक्षरा सिंगचा शेवटचा चित्रपट रुद्र-शक्ती १८ जुलै रोजी प्रदर्शित झाला होता, जो खूप लोकप्रिय झाला होता.





