Akshara singh : ‘अक्षरा सिंग’च्या हॉटनेसने केला कहर; काळ्या गाऊनमध्ये दिली किलर पोज

Updated On:
Photo 1

Akshara singh : अभिनेत्री अक्षरा सिंगला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. ती तिच्या सौंदर्याने, अभिनयाने आणि नृत्याने सर्वांचे मन जिंकते. अलीकडेच, तिने तिच्या नवीन फोटोशूटची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे, जी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्री अक्षरा सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर 6.7 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती तिच्या चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करते. नवीन चित्रपटाशी संबंधित किंवा इतर वैयक्तिक बाब सोशल मीडियावर शेअर करत असते.

दरम्यान, अभिनेत्रीच्या या नवीन फोटोंनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. चाहत्यांना हे फोटो खूप आवडत आहेत. फोटोमध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक दिसत आहे. अभिनेत्री अक्षरा सिंहने काळ्या रंगाचा स्लिट गाऊन घातला आहे.

काळ्या गाऊनसह अभिनेत्रीने स्टायलिश हेअर लूक दिला आहे. तसेच, हलका मेकअप केला आहे. त्याच वेळी, तिने तिचा लूक डायमंड ज्वेलरींनी पूर्ण केला. या लूकमध्ये अक्षरा कॅमेऱ्यासमोर एकामागून एक किलर पोझ देताना दिसत आहे.

फोटो शेअर करताना अक्षरा सिंहने लिहिले की, मी दुबईमध्ये कॅप्टन स्टीलची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून चमकत आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीचे हे फोटो पाहून चाहते जोरदार कमेंट करत आहेत.

तुम्हाला सांगतो की, या फोटोला आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर 600 हून अधिक लोकांनी फोटोवर कमेंट केल्या आहेत. सध्या अभिनेत्रीचा हा ग्लॅमर्स लूक चाहत्यांचे मने जिंकत आहे.

अक्षराने 2010 मध्ये अभिनेते रवी किशन विरुद्ध सत्यमेव जयते या ॲक्शन ड्रामामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ती नंतर 2011 च्या फॅमिली ड्रामा फिल्म, प्राण जाये पर वचन ना जाये मध्ये दिसली.

अक्षरा 2016 च्या रोमँटिक ड्रामा ए बलमा बिहार वाला मध्ये खेसारी लाल यादव सोबत दिसली होती. ती 2017 च्या सत्या, तबदला, माँ तुझे सलाम या ॲक्शन ड्रामामध्ये पवन सिंगच्या विरुद्ध दिसली होती. अभिनेत्रीचा स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग आहे.

आणखी संबंधित बातम्या

Kriti Sanon : क्रिती सेनॉन हॉरर चित्रपटात दिसणार; नव्या प्रोजेक्टची अपडेट समोर

Kriti Sanon : क्रिती सेनॉन हॉरर चित्रपटात दिसणार; नव्या प्रोजेक्टची अपडेट समोर

Salman and Shah Rukh: सलमान आणि शाहरुख खान पुन्हा दिसणार एकत्र? करण जोहरच्या 'त्या' विधानानंतर चर्चांना उधाण

Salman and Shah Rukh: सलमान आणि शाहरुख खान पुन्हा दिसणार एकत्र? करण जोहरच्या 'त्या' विधानानंतर चर्चांना उधाण

Sidharth Malhotra: सिद्धार्थ मल्होत्राच्या पायाला दुखापत; फोटो शेअर करत दिली माहिती

Sidharth Malhotra: सिद्धार्थ मल्होत्राच्या पायाला दुखापत; फोटो शेअर करत दिली माहिती

Ahaan Panday Wishes Aneet Padda: अनीतसाठी अहानची खास पोस्ट! खास शैलीत केलं बर्थडे विश; डेटिंगच्या चर्चांना पुन्हा उधाण

Ahaan Panday Wishes Aneet Padda: अनीतसाठी अहानची खास पोस्ट! खास शैलीत केलं बर्थडे विश; डेटिंगच्या चर्चांना पुन्हा उधाण