Akshara Singh : अभिनेत्री अक्षरा सिंग धमकी प्रकरणी एकाला अटक; पोलिस अॅक्शन मोडवर, चौकशी सुरु

Akshara Singh Death Threat : भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस फेम ‘अक्षरा सिंग’ला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. कॉलवर अभिनेत्रीला ही धमकी देण्यात आली असून, शिवीगाळ करण्यासोबतच 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
अक्षरा सिंगला तिची मागणी पूर्ण करण्यासाठी फक्त 2 दिवसांचा अवधी देण्यात आला होता. या घटनेची अक्षराने दानापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. हा कॉल कोणत्या नंबरवरून आला होता, याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी भोजपूर जिल्ह्यातून एका संशयिताला अटक केली आहे. त्याची चौकशी करण्यासाठी पाटण्याला गेले. प्राथमिक तपासादरम्यान ही बाब उघडकीस आली. सध्या पोलीस अधिकारी या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
अक्षरा सिंग यांनी फिर्याद दिली….
पोलिस स्टेशनचे प्रमुख प्रशांत कुमार भारद्वाज यांनी सांगितले की, अक्षरा सिंहने खंडणी आणि खुनाची धमकी दिल्याची तक्रार करणारा अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून फोन करणाऱ्याला लवकरच पकडण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं होत.
अक्षरा सिंह यांच्यापूर्वी पूर्णिया लोकसभा मतदारसंघातील अपक्ष खासदार पप्पू यादव यांनाही धमकी देण्यात आली होती. पप्पू यादवच्या धमकीमागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नावही समोर येत आहे.





