अकोलाच्या भूमिपुत्राला कर्तव्यावर असताना वीरमरण; गावात शोककळा

Akola News | अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथील जवानाला अयोध्यामध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले आहे. नितेश घाटे असं वीर जवानाचे नाव आहे. विजेचा जोरदार झटका बसल्याने जवान नितेश घाटे यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच गावात शोककळा पसरली आहे.
नितेश मधुकर घाटे गेल्या पंधरा वर्षापासून भारतीय सैन्यात मराठा बटालियनमध्ये सेवा देत होते. निलेश घाटे यांची गेल्या काही दिवसापासून अयोध्या येथे ड्युटी सुरू होती. मात्र २८ जुलैला कर्तव्यावर असताना त्यांना विद्यूत शॉक लागून मृत्यू झाला. दरम्यान त्यांचे पार्थिव उद्या मूळ गावी आणून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. Akola News |
भावाचाही अपघातात मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, विजेचा झटका लागल्याने जवानाचा मृत्यू झाला आहे. मात्र हा झटका कसा लागला याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. कुरणखेड येथील शेतकरी मधुकर घाटे हे शेती करतात. त्यांनी आपल्या तीन मुलांना शिकविले. त्यांचा एक मुलगा शेतकरी आहे.
तर मोठा मुलगा संदीप घाटे हा सुद्धा आर्मीमध्ये सेवा बजावत होते. सेवा संपल्यानंतर त्याचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या नंतर आता लहान मुलगा नितेश घाटे यांना सुद्धा आपल्या कर्तव्यावर असताना वीरमरण आले आहे. Akola News |
हेही वाचा :
ट्रम्पकडून भारतावर २५% कर लादण्याची धमकी ; व्यापार चर्चेदरम्यान एवढे मोठे विधान का केले ? जाणून घ्या





