Akluj News: ‘चला मिळून धरतीला हिरवे करू या’; अकलूजमधील जुन्या कब्रस्तान परिसरात वृक्षारोपण
Akluj News: उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील, साजिद भाई सय्यद यांच्यासह विविध पक्षांचे नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते आयोजनात सहभागी.

Akluj News – अकलूज येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या एका विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन’ आणि ‘मदनी फाउंडेशन’ (अकलूज) यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जुन्या कब्रस्तान (मुस्लिम दफनभूमी) परिसरात अकलूजचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी ‘चला मिळून धरतीला हिरवे करू या’ अशी साद घालत दोन्ही संस्थांच्या वतीने पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्यात आला.
कब्रस्तान परिसरात विविध प्रकारच्या सावली देणाऱ्या आणि पर्यावरणास पूरक असणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या सामाजिक उपक्रमाला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वृक्षारोपण केले. यामध्ये प्रामुख्याने उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील, नगरसेवक मोहसीन शेख, सचिन देशमुख, विशाल मोरे, अजहर शेख, विलास क्षीरसागर, लखन गायकवाड, भैय्या तिकोटे आणि लालासाहेब आडगळे,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा संघटक साजिद भाई सय्यद, ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबूबकर तांबोळी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये रिलीफ फाउंडेशनचे अकलूज शहराध्यक्ष जुबेरभाई सय्यद, साहिल शेख, गुलाम मोहम्मद, इम्तियाज सय्यद, अशफाक शेख तसेच ‘मदनी फाउंडेशन’चे अध्यक्ष कमालबाबा शेख, उपाध्यक्ष भैय्या माढेकर आणि अन्वर भाई बागवान यांचा समावेश होता.
तसेच बजमे अनवारे सोफिया मदरसाचे सेक्रेटरी युसूफ भाई शेख, सलीम सय्यद, पीरखान शेख मित्र मंडळाचे सर्व सदस्य आयोजनात सक्रिय सहभागी झाले होते. या प्रसंगी हाजी अब्दुल मतीन सौदागर, शाहीर अली शेख, अकबर भाई तांबोळी, पंचवटीचे युवा नेतृत्व तय्यब भाई मुलाणी यांच्यासह अकलूज व परिसरातील नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




