Akash Madwal Video : मोठ्या भावाचा आदर! रोहितला पाहताच आकाश मधवालने जोडले हात; MIच्या व्हिडीओने जिंकली चाहत्यांची मनं
Akash Madwal Video : मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवर रोहित शर्मा आणि आकाश मधवालच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Akash Madwal Rohit Sharma MI Camp Video : मुंबई इंडियन्सच्या गोटातून सध्या एक अतिशय भावूक करणारा व्हिडीओ समोर आला आहे. उत्तराखंडचा वेगवान गोलंदाज आकाश मधवाल आणि भारतीय क्रिकेटचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा यांच्या भेटीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. लिलावात अनसोल्ड राहूनही आकाश मुंबईच्या ताफ्यात दिसल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे. Akash Madwal Video
आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक हृदयस्पर्शी व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ३२ वर्षीय वेगवान गोलंदाज आकाश मधवालने रोहित शर्माला भेटल्यावर अत्यंत आदराने दोन्ही हात जोडून त्याला नमस्कार केला. त्यानंतर रोहितनेही मोठ्या भावाच्या मायेने आकाशच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी संवाद साधला.
रोहितनेच दिली होती ओळख – Akash Madwal Video
We are sure you were not expecting this meet up 🥹💙 pic.twitter.com/MBbC2wMEAT
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2026
२०२३ च्या आयपीएल हंगामात रोहित शर्मानेच आकाश मधवालमधील टॅलेंट ओळखून त्याला पदार्पणाची संधी दिली होती. रोहितने दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत आकाशने केवळ ८ सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या होत्या. म्हणूनच आकाश आजही रोहितला आपला मोठा भाऊ आणि मार्गदर्शक मानतो.
अनसोल्ड असूनही मुंबईच्या ताफ्यात? Akash Madwal Video
आयपीएल २०२६ च्या लिलावात ३० लाख रुपये बेस प्राईज असलेला आकाश मधवाल दुर्दैवाने ‘अनसोल्ड’ राहिला होता. मात्र, स्पर्धेच्या तोंडावर तो मुंबई इंडियन्सच्या सराव शिबिरात (MI Camp) दिसल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. तो एखाद्या दुखापतग्रस्त खेळाडूचा बदली खेळाडू (Replacement) म्हणून संघात येईल की केवळ नेट बॉलर म्हणून मदत करेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आयपीएल २०२६ साठी मुंबई इंडियन्सचा पूर्ण संघ:
हार्दिक पंड्या (कर्णधार), क्विंटन डी कॉक, दानिश मालेवार, रॉबिन मिंज, रयान रिकेलटन, शेरफेन रदरफोर्ड, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अथर्व अंकोलेकर, राज बावा, कॉर्बिन बॉश, विल जॅक्स, मयंक रावत, नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तिलक वर्मा, अश्विनी कुमार, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, दीपक चहर, ए.एम. गजनफर, मयंक मार्कंडेय, मोहम्मद इजहार, रघु शर्मा. Akash Madwal Video





