आकाश आनंद बसपाचे मुख्य राष्ट्रीय समन्वयक; आता सांभाळतील निवडणूक प्रचाराची जबाबदारी…

Akash Anand – बहुजन समाज पक्षाने (बसपा) पुन्हा एकदा आकाश आनंद यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. आज झालेल्या बैठकीत बसपने आकाश आनंद यांना मुख्य राष्ट्रीय समन्वयक बनवण्याची घोषणा केली आहे. हे पद मिळाल्यानंतर आकाश आनंद आता पक्षाच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी घेतील. या बैठकीला बसपा प्रमुख मायावती देखील उपस्थित होत्या.
गेल्या महिन्यातच उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांनी पुन्हा एकदा त्यांचा पुतण्या आकाश आनंदला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते.
त्या काळात मायावती यांनी पक्षातील चुका करणाऱ्यांना काढून टाकण्याच्या आणि दुरुस्तीनंतर त्यांना परत घेण्याच्या परंपरेबद्दल बोलताना पक्ष कार्यकर्त्यांना सांगितले होते की, आता त्यांनी आकाश आनंदला प्रोत्साहन दिले पाहिजे. वादांमुळे मायावतींनी यापूर्वी आनंद यांना पक्षातून काढून टाकले होते, परंतु माफी मागितल्यानंतर त्यांना पुन्हा बसपामध्ये समाविष्ट करण्यात आले.





