Chetan Tupe | पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी मुख्य लढत पहायला मिळाली. येथून मनसेने देखील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला होता. तर अपक्ष गंगाधर बधे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. या मतदारसंघात सध्या अजित पवार राष्ट्रवादी गटाचे चेतन तुपे हे आमदार आहेत.
यंदा ते पुन्हा विधानसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रशांत जगताप यांनी उमेदवारी देण्यात आली होती.
मात्र अजित पवारांच्या शिलेदाराचा चेतन तुपे यांचा हडपसरमध्ये विजय झाला आहे. विधानसभेच्या जागावाटपावेळी महायुती आणि महाविकास आघाडीमध्येही हडपसर विधानसभा मतदारसंघात रस्सीखेच पाहायला मिळाली होती.
अखेर येथून महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाकडून प्रशांत जगताप यांना संधी दिली होती. त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार चेतन तुपे यांनी येथून विजय मिळवला आहे. हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे चेतन तुपे सहा हजार मतांनी विजयी झाले आहेत.