Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना महाबळेश्वरमध्ये श्रद्धांजली! सर्वपक्षीय नेत्यांकडून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा
Ajit Pawar : राजकीय मतभेद विसरून महाबळेश्वरमधील दिग्गज नेत्यांनी वाहिली अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Ajit Pawar – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवारी २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान दुर्घटनेत निधन झाल्याची घटना समजताच महाबळेश्वर शहरात कडकडीत बंद पाळून अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे आयोजित श्रद्धांजली सभेस सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा, ठाम नेतृत्वाचा आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचा उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.मनोगत व्यक्त करताना अनेकांनी अजितदादांसोबतच्या आठवणी सांगितल्या. त्यांच्या कार्यकाळातील निर्णय, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि सामान्य जनतेशी असलेली जवळीक यावर बोलताना अनेकजण भावूक झाले.श्रद्धांजली कार्यक्रमादरम्यान मौन पाळून दिवंगत नेत्यास आदरांजली अर्पण करण्यात आली.
संपूर्ण परिसर शोकाकुल वातावरणाने भारावून गेला होता. महाबळेश्वरकरांच्या वतीने अजितदादा पवार यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या कार्याची आठवण करून देण्यात आली.यावेळी नगराध्यक्ष सुनील शिंदे, उपनगराध्यक्ष नासिर मुलाणी, मुख्याधिकारी योगेश पाटील, नगरसेवक अॅड. संजय जंगम, संतोष शिंदे, रविंद्र कुंभारदरे, रोहित ढेबे, राहुल पिसाळ, नगरसेविका विमल पारठे,
संगीता वाडकर, विद्या बावळेकर, रेशमा ढेबे, भाजपाचे डी. एम. बावळेकर, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, शिवसेना शहरप्रमुख विजय नायडू, दत्तात्रय वाडकर, प्रभाकर देवकर, उषाताई ओंबळे, संदीप साळुंखे, भक्ती जाधव, ज्योती वाघदरे, ऋषीकेश वायदंडे, अर्बन संचालक सतीश ओंबळे, अनिल साळुंखे, नितीन साळुंखे, महेश गुजर उपस्थित होते.





