अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर दिलीप वळसे पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
Updated On:

मुंबई : राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज रविवारी, सकाळपासूनच राजभवनात हालचाल सुरू होती. त्यामुळे अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. या चर्चा आता संपल्या असून अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत. दरम्यान, त्यांच्यासोबत आता दिलीप वळसे पाटील यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
आज अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम केला आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारला अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांची साथ मिळाली आहे.





