Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; ट्विटने वेधलं लक्ष

Ajit Pawar | Sharad Pawar – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार 12 डिसेंबर रोजी 85 वा वाढदिवस साजरा करत आहेत. ‘शरद पवार’ हे भारतीय राजकारणातील मोठं नाव. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रिय कृषीमंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पेलवल्या आहेत.
त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले. शरद पवार यांच्याकडे पाहिलं की अनेकांना संघर्षाची प्रेरणा मिळते. आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.
आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा. pic.twitter.com/6SnkF97upb
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 12, 2024
दरम्यान, अश्यातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सुद्धा शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. अजित पवार यांनी ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “आदरणीय शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.” या आशयाचे ट्विट अजित पवारांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट :
अजित पवार यांनी पक्षात बंड करून 2 जुलै रोजी राष्ट्रवादीच्या 8 आमदारांसह शिंदे-फडणवीसह सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले. यावेळी स्वत: अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर इतर आठ जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती.





