‘ऑर्गनायझर’मधील लेखावर राष्ट्रवादीने स्पष्टच सांगितलं,’पराभवाचे खापर आमच्यावर नको’

Ajit Pawar । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जे भाष्य केले आहे. ते निश्चितच भाजपच्या सत्ताधार्यांना जागे करणारे आहे. तर नुकताच रा.स्व. संघाशी संबंधित ‘ऑर्गनायझर’मधील लेखात महाराष्ट्रात महायुतीच्या पराभवाबाबत अजित पवार गटाला कारणीभूत ठरविण्यात आले आहे.
रा.स्व. संघाशी संबंधित ‘ऑर्गनायझर’मधील लेखाशी राष्ट्रवादी पक्ष सहमत नसून भाजपचे नेतृत्वसुद्धा या लेखातील भूमिकेशी सहमत असणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी अजित पवार गटाने मांडली. तसेच भाजपचा विरोध असला तरी मुस्लीम आरक्षणाचा अजित पवार गटाने पुरस्कार केला आहे. अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी याबाबत ट्विट करत स्पष्ट केले आहे.
Ajit Pawar । मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांची पोस्ट
‘अपशय आल्यानंतर अनेक कारणे शोधली जातात. आरोप-प्रत्योराप होत असतात. ऑर्गनायझरमध्ये आलेल्या लेखाशी भाजपचे नेतृत्व सहमती दाखवणार नाही. पराभवाचा ठपका राष्ट्रवादीवर ठेवता येणार नाही. आमची महायुती ही दिर्घकाळाची आहे. त्यामुळे अजित पवार हे भाजपबरोबर यापुढेही असतील. आता आमचे लक्ष विधानसभा निवडणूक आहे. महायुतीमध्ये कोणताही वाद नाही, मतभेद नाही. झालेल्या चुका विधानसभा निवडणुकीत सुधारल्या जातील. मतभेदाचे निराकरण केले जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.’





