पुण्यात अजित पवारांचं गणेश भक्तांना आवाहन ; म्हणाले,”३६ तास मिरवणूक चालली तर…”

Ajit Pawar on Ganesh Visarjan । गणरायाला निरोप देण्यासाठी आज पुणेकर सज्ज झाले आहेत. सकाळी दहा वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेश भक्तांना विसर्जन मिरवणूक लावकर आणि शांततेत पार पाडण्यासाठी आवाहन केले आहे.
यंदाही मानाच्या आणि प्रमुख मंडळांनी विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. ढोल-ताशा पथक, बॅंड, ध्वजपथक याशिवाय विविध संस्था आणि संघटनांचा सहभाग या सगळ्या गोष्टींचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे.
मला दगडूशेठ हलवाई मंडळातल्या सहकाऱ्यांनी सांगितलं की त्यांचं विसर्जन साधारण संध्याकाळी ४ वाजता करण्याचं नियोजन केलं आहे. तसं झालं आणि सर्व गणेश मूर्तींचं त्या त्या दिवशीच विसर्जन झालं तर पोलीस, नागरिकांच्या दृष्टीनं ते बरं होतं.
नाहीतर ३६ तास मिरवणूक चालली तर पोलिसांवरही अतिरिक्त ताण निर्माण होतो. सगळ्यांनी अशा उत्सवाच्या वेळी आपली कर्तव्य, बंधनांचं पालन करावं. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकार व पोलीस यंत्रणेवर असते. पण नागरिकांनीही त्यांच्यावरची बंधनं पाळावीत असे अजित पवारांनी आवाहन केले आहे.





